झटपट अप्पे | Instant Appe

दरवेळी तेच तेच अप्पे खाऊन कंटाळा येत असेल तर बनवा हे नवीन चार पद्धतीचे अप्पे.

झटपट बनवता येतील असे चार अप्प्यांचे प्रकार :

गोड अप्पे –

Plain अप्पे /appam recipe

साहित्य –

  • 2 कप बारीक रवा
  • 1 कप दही
  • मीठ चवीप्रमाणे
  • खाण्याचा सोडा (बेकिंग सोडा)
  • तेल
  • साखर

कृती –

प्रथम, एका मोठ्या भांड्यात 2 कप रवा, 1 कप दही आणि 1 टीस्पून मीठ घ्या. १ कप पाणी व साखर घालून मिक्स करा. मिक्स करून पीठ तयार करा. पुढे दीड कप पाणी घाला आणि 20 मिनिटे झाकून ठेवून द्या. 20 मिनिटांनी ते पुन्हा मिक्स करा.

सर्वकाही पुन्हा चांगले मिसळा. पुढे, ½ टीस्पून बेकिंग सोडा आणि मिक्स करा. ॲप्याचं पॅन गरम करा आणि प्रत्येक साच्यात थोडं तेल घाला. तवा पुरेसा गरम झाला की तयार रवा पिठ घाला. 5 मिनीटे झाकण ठेवा. मंद ते मध्यम आचेवर अप्यांना सोनेरी तपकिरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. शेवटी, चटणीसोबत आस्वाद घ्या.

टिप – तुम्ही साखर न घालता पण आप्पे बनऊ शकता.

व्हेजिटेबल आप्पे-

Vegetable अप्पे / appam recipe

साहित्य –

  • बारीक रवा
  • दही
  • मीठ
  • खाण्याचा सोडा (बेकिंग सोडा)
  • तेल
  • आलं लसूण पेस्ट
  • काळी मिरी पावडर
  • भाज्या (हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, इ.)

कृती –

एका मोठ्या भांड्यात 2 कप रवा, 1 कप दही आणि 1 टीस्पून मीठ घ्या. १ कप पाणी घालून मिक्स करा. मिक्स करून पीठ तयार करा. पुढे दीड कप पाणी घाला, झाकून ठेवा आणि 20 मिनिटे झाकून ठेवून द्या. 20 मिनिटांनी ते पुन्हा मिक्स करा. आता त्यात आलं लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, गाजर आणि 2 मिरच्या घाला.

सर्वकाही पुन्हा चांगले मिसळा. नंतर, ½ टीस्पून बेकिंग सोडा आणि मिक्स करा. ॲप्याचं पॅन गरम करा आणि प्रत्येक साच्यात थोडं तेल घाला. तवा पुरेसा गरम झाला की तयार रवा पिठ घाला. 5 मिनीटे झाकण ठेवा. मंद ते मध्यम आचेवर अअप्यांना सोनेरी व तपकिरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या व गरमा गरम सर्व्ह करा.

बीटाचे अप्पे –

Beetroot अप्पे/ appam recipe

साहित्य –

  • बारीक रवा
  • दही
  • मीठ
  • खाण्याचा सोडा
  • तेल
  • आलं लसूण पेस्ट
  • जीरा पावडर
  • हिरवी मिरची
  • एक बीट (बारीक किसून किंवा पेस्ट करून)
  • काळी मिरी पावडर

कृती –

एका मोठ्या भांड्यात 2 कप रवा, 1 कप दही आणि 1 टीस्पून मीठ घ्या. १ कप पाणी घालून मिक्स करा. मिक्स करून पीठ तयार करा. पुढे दीड कप पाणी घालून 20 मिनिटे झाकून ठेवून द्या. 20 मिनिटांनी ते पुन्हा मिक्स करा. आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची व किसलेले किंवा पेस्ट केलेले बीट घाला.

सर्वकाही पुन्हा चांगले मिसळा व ½ टीस्पून बेकिंग सोडा घाला आणि मिक्स करा. ॲप्याचं पॅन गरम करा आणि प्रत्येक साच्यात थोडं तेल घाला. तवा पुरेसा गरम झाला की तयार रवा पिठ घाला. 5 मिनीटे झाकण ठेवा. मंद ते मध्यम आचेवर अप्यांना छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्या आणि सर्व्ह करा.

पालकचे अप्पे –

साहित्य –

  • बारीक रवा
  • दही
  • मीठ
  • खाण्याचा सोडा
  • तेल
  • आलं लसूण पेस्ट
  • जीरा पावडर
  • पालकची पाने (मिक्सर मध्ये बारीक केलेली)

कृती –

एका मोठ्या भांड्यात 2 कप रवा, 1 कप दही आणि 1 टीस्पून मीठ घ्या. १ कप पाणी घालून मिक्स करा. मिक्स करून पीठ तयार करा. पुढे दीड कप पाणी घाला, झाकून ठेवा आणि 20 मिनिटे झाकून ठेवून द्या. 20 मिनिटांनी ते पुन्हा मिक्स करा. आता त्यात पालकाच्या पानांची पेस्ट, जीरा पावडर व आलं लसूण पेस्ट घाला.

सर्वकाही पुन्हा चांगले मिसळा. पुढे, ½ टीस्पून बेकिंग सोडा आणि मिक्स करा. अप्प्याचं पॅन गरम करा आणि प्रत्येक साच्यात थोडं तेल घाला. तवा पुरेसा गरम झाला की तयार रवा पिठ घाला. 5 मिनीटे झाकण ठेवा. मंद ते मध्यम आचेवर अप्यांना सोनेरी तपकिरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या व सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *