मकर सक्रांती 2024

या वर्षातील सर्वात महत्वाची संक्रांत म्हणजेच मकरसंक्रांत 15 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. मकर संक्रांती ही भगवान सूर्याच्या भक्तीला समर्पित आहे. यासोबतच या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल.

यावर्षी 15 जानेवारी 2024 ला संक्रांतीला काळे कपडे का घालू नये ?

मकर संक्रांती तिळगुळ.

ज्या वर्षी ज्या रांगावर संक्रांत येते तो रंग आपण पूर्णपणे वर्ज्य करत असतो. रीतीप्रमाने, देवी संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र मकर संक्रांती दिवशी परिधान करत नाहीत. या वर्षी देवी संक्रातीने काळ्या रंगाचे वस्त्र घातले आहे. याच करणामुळे मकर संक्रांत 2024 ला काळा रंग वर्ज्य आहे. याच कारणामुळे यावर्षी संक्रातीला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र घालता येणार नाही. संक्रांती दिवशी काळे रंगाचे कपडे घातल्यावर शरीर उबदार राहते. परंतु, यावर्षी काळा रंग वर्ज्य असल्यामुळे थंडीपासून आपला रक्षण व्हावं म्हणून गडद(dark) रंगाचे कपडे घालावेत.

मकर संक्रांतीची कथा :

खूप वर्षांपुर्वी संकासुर नावाचा एक दैत्य (राक्षस) होता. तो लोकांना खूप त्रास देई. त्याचा वध करण्यासाठी संक्रांतीचे रूप देवीने घेतले होते. या संक्रांतीदेवीने संकारसुराचा वध केला आणि लोकांना सुखी केले. पंचांगानुसार या देवीने मकर संक्रांती या दिवशी जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र(कपडे) घालू नये असे मानले जाते.

मकर संक्रांती 2024 रोजी मंत्रांचा जप करा :

मकर संक्रांती 2024 रोजी, ‘आदित्य हृदय स्तोत्र’ पाठ करावा.
याशिवाय या दिवशी खालील मंत्रांचा २१ वेळा जप करावा:

  1. ‘ओम ह्रीं ह्रीं सह सूर्याय नमः’ आणि
  2. ‘ओम घृनिह सूर्य आदिव्योम’

मकरसंक्रांती 2024 ला काय करावे?

1. या दिवशी तुम्ही एक गोष्ट नक्की करावी ती म्हणजे सूर्यदेवाची पूजा.

2. पहाटेच्या ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे आणि सूर्योदयानंतर सूर्याला जल अर्पण करावे. तसेच शक्य असल्यास पवित्र गंगा नदीत स्नान करणे फलदायी मानले जाते.

3. या दिवशी उपवास करणे खूप फायदेशीर मानले जाते.

4. तुमच्या कुंडलीत सूर्य दोष असल्यास पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा करावी.

5. या दिवशी ब्राह्मणाला अन्नदान करून दक्षिणा द्यावी.

6. प्रसादासाठी सूर्यदेवाला तिळाचे लाडू किंवा/आणि गुळाची खीर अर्पण करावी.

7. तुमच्या जीवनात शुभ परिणामांसाठी या दिवशी गूळ, तीळ आणि डाळीचे दान करा.

मकरसंक्रांती 2024 ला काय करू नये?

1. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतेही ‘तामसिक’ अन्नपदार्थ घरी आणू नका किंवा घेऊ नका.

2. या दिवशी तुम्ही सर्वांचा आदर करावा आणि कोणाचाही अपमान करू नये.

3. नकारात्मक विचार आणि नकारात्मक वातावरणापासून दूर रहावे (नकारात्मक उर्जेची चिन्हे).

4.या दिवशी कोणी तुम्हाला भेटायला आले तर त्यांना रिकाम्या हाताने परत येऊ देऊ नका.

5. या दिवशी हळदीचा टिळा लावू नये, पिंजर लावली तर चालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *