झटपट साबुदाणा वडा | Instant sabudana vada

जर तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरलात, पण तुम्हाला अजूनही साबुदाणा वडा हवा आहे. किंवा व्रत, उपवासाच्या दिवसांसाठी काहीतरी लवकर तयार करायचे आहे. तर आजची ही अत्यंत चविष्ट, झटपट तयार होणारी, साबुदाणा वड्यासारखी तडा न जाणारी. व दातांमध्ये चिकटून न राहणारी पाककृती खास तुमच्यासाठी. ही पाककृती झटपट व कमी वेळात बनवून तयार होते.

हा साबुदाणा वडा गरोदरपणात पण खाल्ला जाऊ शकतो. कारण साबुदाणा हा आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे. पचायलाही सोपा आहे .

Instant sabudana vada
झटपट साबुदाणा वडा


साहित्य :-


1 वाटी साबुदाणे
2 हिरव्या मिरच्या
2 बटाटे
बारीक चिरलली कोथिंबीर
बारीक चिरलेला कढीपत्ता
जीरा
तेल
पाणी

साबुदाणा वाड्याची कृती :-

सर्वप्रथम बटाटे उकडून व किसून घ्या

त्यानंतर मिक्सरमध्ये, 1 वाटी साबुदाणे बारीक करून घ्या.

एका वाडग्यात किसलेले बटाटे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कढीपत्ता, जिरे व मीठ घालून मळून घ्या.

नंतर त्यामध्ये थोडं साबुदाण्याच पीठ घाला व मळा परत थोडं असं करत करत सर्व पीठ मळून घ्या. (जर सर्व साबुदाण्याचं पीठ एकच वेळी घातलं तर ते नीट मळलं जात नाही). जर मळत असताना पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी वापरावं. अन्यथा पाणी नाही वापरलं तरी चालेल.
त्यानंतर साधारण चपातीच्या गोळ्याच्या आकाराचा गोळा तयार करावा व चापतीपेक्षा जरा जाडसर लाटून घ्यावा.
मग त्याचे चौकोनी, त्रिकोणी किंवा गोल कोणत्याही आकाराचे तुकडे पाडावे.
एका पॅन मध्ये तेल तापवावे.
तळत असताना सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्या. त्यात हे तुकडे घालून, मंद आचेवर सोनेरी रंग येपर्यंत तळून घ्यावे. तळून झाल्यानंतर हे वडे गरमा गरम उपवासाच्या चटणीसोबत खावे.

वजन कमी करण्यासाठी साबुदाणा चांगला नसला तरी वजन वाढवण्यासाठी चांगला आहे. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे, तरीही फॅट्सचे प्रमाण कमी आहे, ज्यामुळे वजन वाढण्यासाठी ते आरोग्यदायी पर्याय बनते. हे तुम्हाला जास्त चरबी खाण्याशी संबंधित प्रतिकूल परिणाम टाळण्यास मदत करते, जसे की हृदयविकाराचा धोका वाढतो.

असे म्हटले जाते की साबुदाणा थंड आहे. शरीरातील उष्णता संतुलित करण्यासाठी एक प्रभावी आणि साधे अन्न आहे. मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी साबुदाणे खाणे टाळावे. कारण त्यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते. आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *